मुंबई, 20 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभर प्रमुख शासकीय ध्वजारोहण समारंभ एकाच वेळी सकाळी 9:15 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क याठिकाणी ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच 26 जानेवारी रोजी विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांवरील ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1880947836684214576?t=kjG9_H80qTpOhEKVaZYccQ&s=19
राज्यभरातील विभागीय व जिल्हास्तरीय ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
जिल्हा आणि मंत्र्यांची नावे –
1. ठाणे – एकनाथ शिंदे
2. पुणे – अजित पवार
3. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
4. अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
5. वाशिम – हसन मुश्रीफ
6. सांगली – चंद्रकांत पाटील
7. नाशिक – गिरीश महाजन
8. पालघर – गणेश नाईक
9. जळगाव – गुलाबराव पाटील
10. यवतमाळ – संजय राठोड
11. मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा
12. मुंबई उपनगर – आशिष शेलार
13. रत्नागिरी – उदय सामंत
14. धुळे – जयकुमार रावल
15. जालना – पंकजा मुंडे
16. नांदेड – अतुल सावे
17. चंद्रपूर – अशोक उईके
18. सातारा – शंभुराज देसाई
19. बीड – दत्तात्रय भरणे
20. रायगड – आदिती तटकरे
21. लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
22. नंदुरबार – माणिकराव कोकाटे
23. सोलापूर – जयकुमार गोरे
24. हिंगोली – नरहरी झिरवाळ
25. भंडारा – संजय सावकारे
26. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
27. धाराशिव – प्रताप सरनाईक
28. बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
29. सिंधुदुर्ग – नितेश राणे
30. अकोला – आकाश फुंडकर
31. गोंदिया – बाबासाहेब पाटील
32. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
33. गडचिरोली – आशिष जयस्वाल
34. वर्धा – पंकज भोयर
35. परभणी – मेघना साकोरे-बोर्डीकर
36. अमरावती – इंद्रनील नाईक