बारामतीत वीर गोगादेव यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन

बारामती, 23 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे यंदा वाल्मिकी समाजाचे आराध्य असलेले दैवत वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव दरवर्षी बारामती सार्वजनिक गोगादेव जन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्त महाआरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.



त्यानुसार, रविवार दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजता बारामती येथील दुर्गा टॉकीज समोर, उघडा मारूती मंदिर शेजारी महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बारामती नगर परिषदेचे नगरसेवक कुंदन लालबिगे यांनी केले आहे.



दरम्यान, दरवर्षी बारामतीत दैवत वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात अनेक लोक सहभागी होत असतात. यंदाही बारामतीत दैवत वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव बारामती सार्वजनिक गोगादेव जन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची तयारी सध्या जवळपास पूर्ण झाली आहे. तर या उत्सवात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *