महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – वर्षा गायकवाड

मुंबई, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे.

या पत्रात वर्षा गायकवाड यांनी लिहिले आहे की, “भारताचे उद्‍धारक, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अर्थात येत्या ६ डिसेंबर रोजी राज्य सरकारने मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी लेखी मागणी मी मा. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांना केली आहे.

सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ठरला!

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होत असतात. तसेच या दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांचा समता व न्यायाचा विचार घेऊन राज्यासह मुंबईच्या अनेक भागांत विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी होतात. मात्र या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांची कार्यालये सुरू असल्याने या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही.

मुंबईत 2 तास फटाके फोडता येणार; हायकोर्टाचा निर्णय

त्यामुळे 6 डिसेंबर रोजी राज्यात सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी अनु. जाती/जमाती, वि.जा.-भ.ज./इ.मा.व./वि.मा.प्र./शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच राज्यातील अनेक संघटना अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने देखील यादिवशी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली आहे. वरील बाबी लक्षात घेता आणि आंबेडकरी जनतेच्या भावनांची त्वरित दखल घेऊन शासनाने 6 डिसेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करावी ही मागणी आहे.” दरम्यान वर्षा गायकवाड यांच्या या पत्रावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 Comments on “महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – वर्षा गायकवाड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *