प्रयागराज मध्ये आजपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात; लाखो भाविकांनी केले पवित्र स्नान

महाकुंभमेळा 2025 दरम्यान प्रयागराजचे हवाई दृश्य.

प्रयागराज, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) धर्म आणि श्रद्धेची नगरी असलेल्या प्रयागराजमध्ये सोमवारी (दि.13) पौष पौर्णिमा स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. पौष पौर्णिमेनिमित्त आज त्रिवेणी संगमात लाखो लोकांनी पवित्र स्नान केले. पहिल्या दिवशी ‘शाही स्नान’ झाले, ज्यामध्ये सुमारे 50 लाख भाविकांनी पवित्र स्नान केल्याचा अंदाज आहे. महाकुंभमेळा हा श्रद्धा, साधना आणि संस्कृतीचा अभूतपूर्व संगम असून, या ऐतिहासिक उत्सवाचा कालावधी 26 फेब्रुवारीपर्यंत आहे. हा उत्सव 45 दिवस चालणार आहे. यामध्ये 40 कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या महाकुंभमेळ्याला 144 वर्षांत एकदाच होणारा दुर्मिळ खगोलीय योगायोग लाभला आहे, ज्यामुळे या सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

https://x.com/AHindinews/status/1878573156354642227?t=s5qJ8_DbZzrHhtxGqklu5Q&s=19

https://x.com/AHindinews/status/1878655903211376832?t=Qpm4JKc5toN5dGBNqy4MxQ&s=19

गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यूपी पोलिस, आरएएफ, सीआरपीएफ आणि जल पोलिसांची विशेष टीम तैनात आहे. तसेच, भाविकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफने जलवाहन रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून मेला क्षेत्रात सातत्याने गस्त घालण्यात येत आहे.

https://x.com/AHindinews/status/1878634980680839655?t=LM–7E83MWQx4my8M6nCXQ&s=19

पहिले शाही स्नान

महाकुंभमेळ्याचा प्रारंभ शाही स्नानाने झाला असून, आज सुमारे 50 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. परदेशी भाविकांनीही त्रिवेणी संगमात डुबकी मारून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षात्कार घेतला. प्रयागराजचे डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले की, “सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत आहेत, गर्दी नियंत्रण आणि वाहतुकीचे व्यवस्थापन सुरळीत सुरू आहे.”

https://x.com/narendramodi/status/1878638066879132032?t=WJjUlHZfkil7p6_dKEMcCQ&s=19

मोदी आणि योगींनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमेळ्याच्या शुभारंभाबद्दल ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, “पौष पौर्णिमेला पवित्र स्नान करून प्रयागराज या पवित्र ठिकाणी आजपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. महाकुंभमेळा 2025 च्या शुभारंभाच्या या दिव्य क्षणी मी सर्व भाविकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा अध्यात्मिक उत्सव तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करो.”

https://x.com/myogiadityanath/status/1878564860281458927?t=X8SLXWSHA9554yGMnIlLtA&s=19

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विटद्वारे भाविकांचे स्वागत केले. त्यांनी लिहिले, “विश्वातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळाव्या ‘महाकुंभमेळ्या’चा आजपासून तीर्थराज प्रयागराज येथे शुभारंभ होत आहे. विविधतेत एकता अनुभवण्यासाठी, श्रद्धा आणि आधुनिकतेच्या संगमस्थानी साधना आणि पवित्र स्नान करण्यासाठी येणाऱ्या सर्व पूज्य संतांना, कल्पवासांना, श्रद्धालुंना हार्दिक स्वागत आहे. माता गंगा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. महाकुंभमेळा प्रयागराजच्या शुभारंभ आणि पहिल्या स्नानाच्या मंगलमय शुभेच्छा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *