महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन

पुणे, 25 नोव्हेंबरः वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी, 26 नोव्हेंबर आणि रविवारी, 27 नोव्हेंबर या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली आहे. ही थकबाकी वसूल करण्याची महावितरणची विशेष मोहीम सुरु आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे, म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे चालू असणार आहे.

मुर्टीच्या ‘या’ रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य

थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघु दाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www. mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

अबब! बँकेत चक्क 500 रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

यासह लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

One Comment on “महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *