बारामती, 28 जूनः सध्या राज्यात बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसैनिक संभ्रमात आहेत. तसेच राज्यातील विविध भागात या बंडखोर आमदारांच्या विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन, निर्दशन आणि घोषणाबाजी होताना दिसत आहे. मात्र बारामतीत बंडखोर आमदारांना सद्बुद्धी मिळावी, आणि त्यांची घरवापसी व्हावे यासाठी शहरातील गणपतीला साकडे घालून महाअभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वात भिगवण चौकात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बारामती शिवसेना, युवासेना, कामगार सेना, महिला आघाडी, वाहतुक सेना, वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनावेळी विभाग प्रमुख उमेश दुबे, शहर प्रमुख सचिन (पप्पू) माने, युवासेना तालुका प्रमुख निखिल देवकाते, युवासेना, शिवसेना महिला आघाडी यासह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.