पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर ‘माफीवीर’चे बॅनर

पुणे, 18 नोव्हेंबरः स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी 17 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत एक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. राहुल गांधींच्या निषेधार्थ काल, गुरुवार पासूनच भाजप, मनसे आदी राजकीय पक्षांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडूनही या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

बारामती ते मुंबई रेल्वे सेवा लवकरच सुरु होणार?

हा वाद सुरु असतानाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील सावरकरांच्या पुतळ्यासमोर आज, 18 नोव्हेंबर रोजी ‘माफीवीर’ चे बॅनर लावण्यात आले होते. पुण्यातील सारसबाग चौकातील विनायक सावरकरांच्या पुतळ्याच्या समोर आज सकाळी माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे बॅनर लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सदर बॅनर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले होते. हे बॅनर मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास लावण्यात आलेले. दरम्यान, सावरकर यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेले हे बॅनर एका व्यक्तीने येऊन हटवले. ही व्यक्ती सावरकरप्रेमी असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारे बॅनर लावणाऱ्यांनीच माफी मागितली पाहिजे, अशी भावना संबंधित व्यक्तीने बोलून दाखवली आहे.

10वी-12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

One Comment on “पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर ‘माफीवीर’चे बॅनर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *