नांदेड, 28 ऑक्टोंबर: (अनिकेत कांबळे) नांदेड शहरातील हदगाव हिमायतनगर या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव जवळगावकर यांनी सोमवारी (दि.28) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. यामुळे इथे महायुती का महाविकास आघाडी कोणाकडे जनतेचा कौल असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकंदरीत आज माधवराव जवळगावकर यांनी लोकांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या संख्येने ढोल ताशांच्या गजरात व वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव करून आलेले लोक व आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपलेले पेहराव हे सर्व लोक या फॉर्म भरण्यासाठी आले होते. परंतु जी यंदाची लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून दिले होते. परंतु दुसरीकडे याच वेळेस भाजप सरकारला लोकसभेमध्ये पराभव पत्करावा लागला होता. परंतु आता विधानसभेमध्ये काय घडणार आणि कोणाचे जास्त उमेदवार निवडून येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.