एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त!

दिल्ली, 1 नोव्हेंबरः केंद्र सरकारनं एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. यामुळे 19 किलोंचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर हे तब्बल 115.50 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एलपीजीचे नवे दर हे आज, 1 नोव्हेंबर पासून देशभरात लागू झाले आहेत.

माळेगाव ताडी प्रकरणात मोठी अपडेट

सदर एलपीजीच्या दरात मोठी कपात झाल्याने इण्डेन गॅस, भारत गॅस, गो गॅस आदी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे 1844 रुपयांना मिळणारे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता 1696 रुपयांना मिळणार आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलेंडरच्या किंमत 6 जुलै 2022 पासून स्थिरच आहेत.

इंदापुरात रानगव्यांचं दर्शन?

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत निश्चित करतात. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2022 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

One Comment on “एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *