दिल्ली, 01 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी 2025 पासून सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 14.50 रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत 1804 रुपये झाली आहे. मुंबईत हा सिलिंडर 1756 रुपयांना मिळत आहे, तर कोलकातामध्ये 1911 रुपये आणि चेन्नईमध्ये 1966 रुपये आहे.
गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत दर वाढवले गेले होते, परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडर स्वस्त करत ग्राहकांना दिली आहे. हे ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर खासकरून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि व्यावसायिक ठिकाणी होत असतो आणि यामुळे ही कमी किंमत व्यवसायिकांना मोठा फायदा पोहोचवेल. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतील हा बदल नवीन वर्षाच्या सुरूवातीला ग्राहकांसाठी एक चांगला फायदा आहे.
घरगुती गॅसच्या किंमती स्थिर!
तथापि, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 1 ऑगस्ट 2024 रोजी शेवटचा बदल झाला होता. त्यानुसार दिल्लीमध्ये सध्या घरगुती गॅस सिलिंडर 803 रुपयांना मिळत आहे. मुंबईत या गॅस सिलिंडरची किंमत 802.50 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपये आहे.