बारामती, 7 ऑक्टोबरः ऐन पावसाळ्यात बारामती शहरातील आमराई विभागात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन सुरु झाली आहे. बारामती नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गालथाण कारभारामुळे अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वंचितच्या तीन शाखांचे बारामतीत उद्घाटन संपन्न!
जलकुंडामध्ये पाणी व्यवस्थित भरले जात नसल्याने पाणी कमी दाबाने येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर जलकुंड भरण्याचे काम नगरपरिषदेने वेगळ्या प्रशासनाकडे दिले असल्याचे तक्रार स्थानिक कर्मचारी सांगत आहेत. तर स्थानिक कर्मचारी व्यवस्थित पाणी सोडत नसल्याने कमी दाबाने पाणी येत आहे, अशी टोलवा- टोलवी नगरपरिषद प्रशासन करत आहे.
बारामतीत वाहतुक व्यवस्था कोलमडली!
नगरपरिषदेच्या अंतर्गत वादविवाद व कुरघोडीच्या कार्यपद्धतीमुळे आमराई विभागातील नागरिक हैराण झाले आहेत. आमराई विभागातील नागरिक नगरपरिषद आणि पाणीपुरवठा विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत, असे आरपीआय शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी सांगितले.
One Comment on “आमराई विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा!”