लोणावळा, 1 नोव्हेंबर: लोणावळा शहरामध्ये मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा आढावा दौरा नुकताच आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये नागरिकांनी विकासाची कामे सुचविण्यात आलेली होती. त्यापैकी बरीच कामे मार्गी लागली असून प्रशासकीय मान्यता तांत्रिक मंजूरी मिळाल्यानंतर लोणावळा नगर पालिकेच्या वतीने टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

या कामा संदर्भात सतत पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून लोणावळा शहराच्या विकासात माझा हातभार लागल्याचे मला समाधान आहे, अभिमान आहे, असे मत आरपीआय (आठवले) चे प्रदेश सचिव, मा. नगराध्यक्ष लोनपा मा. सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती सभापती लोणावळा नगर पालिका शिक्षण मंडळ सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.

तसेच मावळचे कार्यसम्राट आमदार सुनिल शेळके, प्रशासक सुरेंद्र नवले, मुख्याधिकारी अशोक साबळे, मुख्य अभियंता पंढरीनाथ साठे, नगरपालिका बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी, याच बरोबर सर्व पक्षिय नेते, कार्यकर्ते यांचे सूर्यकांत वाघमारे यांनी आभार मानले.


