लोकसभा निवडणूक; राज्यात आज नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा

मुंबई, 15 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यातील 4 टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, आज राज्यात अनेक प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा तसेच रोड शो पार पडणार आहेत. या सभांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1790588056551960977?s=19

मोदींची कल्याणमध्ये सभा

महाराष्ट्रात लोकसभेसाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यानुसार मोदींची आज नाशिक आणि कल्याण येथे जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज साधारणतः दुपारी दोन वाजता कल्याण येथे सभा घेणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपर येथे रोड शो होणार आहे.

https://twitter.com/DrBharatippawar/status/1790361813894238244?s=19

मोदी नाशिकच्या दौऱ्यावर

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ भारती पवार आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डाॅ सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेची तयारी आता पुर्ण झाली आहे.

https://twitter.com/SudhakarBhau/status/1790329488665874620?s=19

https://twitter.com/Mahadev_Balgude/status/1790595063552332010?s=19

ठाकरे पवारांच्या नाशिक जिल्ह्यात सभा

पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील आज जाहीर सभा पार पडणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज वणी येथे जाहीर सभा होणार आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *