बारामती, 07 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यामध्ये आज राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 53.40 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 63.71 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 45.68 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान कमी मतदान झाल्यामुळे बारामतीमधील उमेदवारांची चिंता वाढली आहे.
#LokSabhaElection2024।सायं. ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५३.४० टक्के मतदान #ChunavKaParv #DeshKaGarv #ECI #IVoteForSure pic.twitter.com/qHAbEuQCR5
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 7, 2024
पाहा मतदानाची आकडेवारी –
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान पार पडले. यामध्ये रायगड – 50.31 टक्के, बारामती – 45.68 टक्के, उस्मानाबाद – 52.78 टक्के, लातूर – 55.38 टक्के, कोल्हापूर – 63.71 टक्के, माढा – 50 टक्के, सांगली – 52.56 टक्के, सातारा – 54.11 टक्के, कोल्हापूर – 63.71 टक्के, हातकणंगले – 62.18 टक्के आणि रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात 53.75 टक्के इतके सरासरी मतदान झाले आहे.
बारामतीत उमेदवारांची चिंता वाढली
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात 45.68 टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. त्यामुळे बारामतीतील दोन्ही उमेदवारांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे दोन्ही पवारांसाठी ही लोकसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. मात्र, मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे दोन्ही पक्षांचे टेन्शन वाढले आहे.