लोकसभा निवडणूक; राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.85 टक्के मतदान! अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या 11 मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 30.85 टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 37.33 टक्के मतदान झाले आहे. तर पुण्यात 26.48 टक्के सर्वात कमी मतदान झाले आहे. यासंदर्भातील आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1789946726406590743?s=19

https://twitter.com/mohol_murlidhar/status/1789946521854619711?s=19

https://twitter.com/MPShrirangBarne/status/1789939260511961162?s=19

पुण्यातील उमेदवारांनी केलं मतदान

दरम्यान, राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील अनेक नेते आणि उमेदवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तसेच पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहपरिवार आज सकाळी पुण्यातील एमआयटी शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी त्यांच्या पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांनी देखील मतदान केले. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही मतदानाचा हक्क बजावला. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

https://twitter.com/RVikhePatil/status/1789880072058314975?s=19

विखे पाटील, लंके यांनी बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगरमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातील लोणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगा सुजय विखे पाटील आणि सून हे उपस्थित होते. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे सहकुटुंब मतदान केले. अहमदनगरमधील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यामधील जोरवे येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज पारनेर तालुक्यातील हंगा या गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

https://twitter.com/khadseraksha/status/1789888263450243402?s=19

https://twitter.com/Pankajamunde/status/1789932736729215173?s=19

या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

जालना लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. जालना लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी पिसादेवी येथे मतदान केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी सहपरिवार मतदान केले. औरंगाबादमध्ये राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राजूर येथे माजी मंत्री भाजप नेते मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी सहपरिवार मतदान केले. बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. रावेर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी कोथळी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ खडसे उपस्थित होते. तसेच रोहिणी खडसे यांनी रावेर मतदार संघातील कोथळी येथे मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *