नवी दिल्ली, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी भाजपने दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांतील एकूण 72 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या 20 उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांसारख्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
Union Minister Anurag Thakur to contest from Himachal Pradesh’s Hamirpur, former Karnataka CM Basavaraj Bommai to contest from Haveri, BJP MP Tejasvi Surya to contest from Bangalore South, Union Minister Nitin Gadkari to contest from Nagpur, Union Minister Piyush Goyal to contest… https://t.co/FMsQL4yX1M
— ANI (@ANI) March 13, 2024
हे 20 उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात!
नंदुरबार मधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे, जळगांव येथून स्मिता वाघ, रावेर मतदार संघातून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितिन गडकरी, चंद्रपुरमधून सुधीर मुंगंटीवार, नांदेड येथून प्रतापराव पाटील चिखलीकर, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरी मधून डॉ. भारती पवार, भिवंडी मधून कपिल पाटील, मुंबई उत्तर मतदार संघातून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्व मतदार संघातून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, बीडमधून पंकजा मुंडे, लातूर येथून सुधाकर श्रृंगारे, माढा मतदार संघातून रणजीत निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील या नेत्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे.