पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.51 टक्के मतदान झाले आहे. त्याची आकडेवारी राज्याच्या निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 22.12 टक्के मतदान झाले आहे. त्याचवेळी शिरूरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वात कमी म्हणजे 14.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान ही आकडेवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची असून, यानंतर मतदानाची टक्केवारी वाढणार आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1789907032310501391?s=19
कोणत्या भागांत किती टक्के मतदान?
चौथ्या टप्प्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत नंदुरबार – 22.12 टक्के, जळगाव – 16.89 टक्के, रावेर – 19.03 टक्के, जालना – 21.35 टक्के, औरंगाबाद – 19.53 टक्के, मावळ – 14.87 टक्के, पुणे – 16.16 टक्के, शिरूर – 14.51 टक्के, अहमदनगर – 14.74 टक्के, शिर्डी – 18.91 टक्के आणि बीड – 16.62 टक्के इतके मतदान झाले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1789903620659388502?s=19
देशात सरासरी 24.87 टक्के मतदान
यासोबतच देशात लोकसभा निवडणुकीसाठी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 96 जागांवर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत देशात सरासरी 24.87 टक्के इतके मतदान झाले होते. यामध्ये आंध्र प्रदेश – 23.10 टक्के, बिहार 22.54 टक्के, जम्मू आणि काश्मीर – 14.94 टक्के, झारखंड – 27.40 टक्के, मध्य प्रदेश – 32.38 टक्के, महाराष्ट्र – 17.51 टक्के, ओडिसा – 23.28 टक्के, तेलंगणा – 24.31 टक्के, उत्तर प्रदेश – 27.12 टक्के आणि पश्चिम बंगाल – 32.78 टक्के मतदान झाले आहे.