मुर्टीमध्ये पुलाचे काम बंद स्थित; ग्रामस्थांची गैरसोय

बारामती, 4 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळू बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील नीरा मोरगाव रोड ते नलवडे बालगुडे रोडवर पुलाचे बांधकाम चालू आहे. मात्र गेली सहा महिन्यापासून सदर काम बंद आहे. या बंद पडलेल्या कामामुळे गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विक्रीस ठेवलेल्या तिरंगा झेंडाची किंमत एकसारखी ठेवण्याची मागणी

संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराचे सदर कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे काम माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या तालुक्यात असून सुद्धा ठेकेदारांना या कामाविषयी कोणत्याही प्रकारची काळजी नाही, असे दिसते. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आज करू, उद्या करू असे करून सहा महिन्यापासून टकलाढकलीची उत्तरे मिळत आहे.

अजित पवार यांच्या तालुक्यात विकासाची गंगा ही फक्त नावापुरतीच उरलेली आहे. बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील 23 गावांमध्ये आजही रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली दिसते. अजित पवार यांनी फक्त बारामती तालुक्याचा विकास केला, असे नुसते गाजर दाखवलेले आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारचे नागरी सुविधांची व्यवस्थितपणे कामे होत नाहीत. सदर कामाकडे अजित पवार यांनी लक्ष देऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *