मनसेच्या 45 उमेदवारांची यादी प्रसिद्ध; अमित ठाकरेंना माहीम मधून उमेदवारी

मुंबई, 23 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने त्यांच्या 45 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी (दि.22) रात्री उशिरा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम मधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याबरोबरच मनसेचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे वरळीतून निवडणूक लढवणार आहेत. वरळी मतदारसंघात संदीप देशपांडे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे 288 पैकी किती जागांवर उमेदवार उभा करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



मनसेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी

1) कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील

2) माहीम – अमित राज ठाकरे

3) भांडुप पश्चिम – शिरीष गुणवंत सावंत

4) वरळी – संदीप सुधाकर देशपांडे

5) ठाणे शहर – अविनाश जाधव

6) मुरबाड – श्रीमती संगिता चेंदवणकर

7) कोथरूड – किशोर शिंदे

8) हडपसर – साईनाथ बाबर

9) खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे

10) मागाठाणे – नयन प्रदीप कदम

11) बोरीवली – कुणाल माईणकर

12) दहिसर – राजेश येरुणकर

13) दिंडोशी – भास्कर परब

14) वर्सोवा – संदेश देसाई

15) कांदिवली पूर्व – महेश फरकासे

16) गोरेगांव – विरेंद्र जाधव

17) चारकोप – दिनेश साळवी

18) जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे

19) विक्रोळी – विश्वजित ढोलम

20) घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल

21) घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे

22) चेंबूर – माऊली थोरवे

23) चांदिवली – महेंद्र भानुशाली

24) मानखुर्द-शिवाजीनगर – जगदीश खांडेकर

25) ऐरोली – निलेश बाणखेले

26) बेलापूर – गजानन काळे

27) मुंब्रा-कळवा – सुशांत सुर्यराव

28) नालासोपारा – विनोद मोरे

29) भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी

30) मिरा-भाईंदर – संदीप राणे

31) शहापूर – हरिश्चंद्र खांडवी

32) गुहागर – प्रमोद गांधी

33) कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी

34) आष्टी – कैलास दरेकर

35) गेवराई – मयुरी बाळासाहेब मस्के

36) औसा – शिवकुमार नागराळे

37) जळगांव शहर – डॉ. अनुज पाटील

38) वरोरा – प्रवीण सूर

39) सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे

40) कागल – रोहन निर्मळ

41) तासगांव-कवठे महाकाळ – वैभव कुलकर्णी

42) श्रीगोंदा – संजय शेळके

43) हिंगणा – विजयराम किनकर

44) नागपूर दक्षिण – आदित्य दुरूगकर

45) सोलापूर शहर-उत्तर – परशूराम इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *