पुणे, 18 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड थंडी पडली आहे. त्यामुळे अनेक भागांत सध्या तापमानाचा पारा खाली आलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे तापमान आज आज (दि.18) 10 अंश सेल्सिअसच्या घरात होते. पुणे शहराच्या विविध भागांत आज किमान तापमान 7 अंश सेल्सिअसच्या घरात नोंदवले गेले आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे सकाळी रस्त्यांवर जागोजागी सध्या लोकांनी शेकोट्या पेटवल्या असल्याचे चित्र दिसून आले. तसेच या थंडीमुळे सकाळी घराबाहेर पडताना लोकांनी स्वेटर, जर्कींग, पायमोजे, मफलर, कानटोपी यांसारखे उबदार कपडे घातल्याचे पहायला मिळाले.
https://x.com/ANI/status/1869205367827431852?t=euzIwYriEidYBCFXSPUkzQ&s=19
राज्याचा पारा घसरला
राज्यातील परभणी जिल्ह्यात आज (दि.18) 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच सातारा 10.1 अंश सेल्सिअस, चिकलठाणा 11 अंश सेल्सिअस, सांगली 11.6 अंश सेल्सिअस, उदगीर 9.4 अंश सेल्सिअस, नांदेड 8.9 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.4 अंश सेल्सिअस, ठाणे 20 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 14.8 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 17.7 अंश सेल्सिअस, पुणे 8.9 अंश सेल्सिअस, डहाणू 16 अंश सेल्सिअस, धाराशिव 8.6 अंश सेल्सिअस, मालेगाव 11 अंश सेल्सिअस, बारामती 9 अंश सेल्सिअस, माथेरान 13.6 अंश सेल्सिअस, जळगाव 8.4 अंश सेल्सिअस नाशिक 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पहा पुणे शहराचे तापमान
तसेच पुणे शहर आणि जिल्हा सध्या चांगलाच गारटलेला दिसत आहे. पुणे शहरातील एनडीए परिसरातील तापमानाचा पारा आज (दि.18) सकाळी 7.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. त्याचबरोबर पुणे शहरातील मगरपट्टा परिसरात 15.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच चिंचवड येथे 14.7 अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क 13.9 अंश सेल्सिअस, लवळे 15.2 अंश सेल्सिअस, दापोडी 13.1 अंश सेल्सिअस, पाषाण 9.3 अंश सेल्सिअस, लवासा 11.2 अंश सेल्सिअस, शिवाजीनगर 8.9 अंश सेल्सिअस आणि लोणावळा येथे 12.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्याचे तापमान –
तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज (दि.18) सकाळी 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच इंदापूर तालुक्यात 9.7 अंश सेल्सिअस, भोर 13.1 अंश सेल्सिअस, पुरंदर 10.1 अंश सेल्सिअस, खेड 14.9 अंश सेल्सिअस, दौंड 9.1 अंश सेल्सिअस, आंबेगाव 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
थंडी वाढली
दरम्यान, या कडाक्याच्या थंडीचा परिणाम जनजीवनावरही झालेला दिसून आला आहे. सकाळी उशिरापर्यंत लोक रस्त्यांवर उबदार कपडे घालून फिरताना दिसत होते. तसेच या थंडीच्या कडाक्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून लोकांनी सकाळी शेकोट्या पेटवल्या होत्या. तसेच या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून आली. थंडीच्या या वातावरणाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट आहे.