परिवर्तन व्याख्यानमालेतून गावचा विकासाचे गिरवले धडे

बारामती/मुर्टी, 25 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) मुर्टी येथे दिवाळी निमित्त परिवर्तन व्याख्यानमालेचे पर्व पहिले आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात पहिले पुष्प राष्ट्रपती पुरस्कार विजेते पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावच्या विकासा बाबत संकल्पना मांडल्या. गावचा विकास करणाऱ्या व्यक्तीला नेहमी पाठींबा देयाचा व त्या व्यक्ती सोबत स्वतः मेहनत करायचां मंत्र ही पेरे पाटलांनी दिली. मुर्टी गावात सर्वसाधारण हजारोहून अधिक झाडे लावल्याने गावचे, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे अभिनंदनही केले.

निरा- मोरगाव मार्गावरून खडी व गौण खनिजाची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक

याच परिवर्तन व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प मानसोपचार तज्ञ डॉ. दत्ताजी कोहीणकर यांचे झाले. डॉ.कोहीणकर यांनी जीवनात अपयश येत असेल तर यश कसे मिळवायचे, याचा मंत्र दिला. नकारार्थी आयुष्य न जगता सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.

 

या व्याख्यानासाठी मुर्टी व पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. व्याख्यानाचे सौजन्य अक्षरज्ञान प्रतिष्ठान व डॉ. संकेत सावंत हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुर्टी गावचे युवा उद्योजक गजानन वाघमोडे, मुर्टी गावच्या सरपंच मंगल खोमणे, उपसरपंच किरण जगदाळे व ग्रामपंचायत सदस्य हे पहिल्या व्याख्यान पुष्पचे अध्यक्षस्थानी होते. तर दुसऱ्या पुष्पचे अध्यक्ष मुर्टी गावचे युवा उद्योजक अल्ताफ शेख, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब नलवडे, डॉ. संजय सावंत हे होते.

जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच! उद्धव ठाकरेंचा शिंदेवर निशाणा

गजानन वाघमोडे यांनी गावचे ऋण माझ्यावर असल्याने मी हे ऋण गावच्या मदतीतून करणार असल्याचे वाघमोडे यांनी म्हटले. तर अल्ताफ शेख यांनी त्यांचे चुलते रजाक शेख यांचे व गावचे आभार मानत गावच्या विकासासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे म्हटले आहे.

या व्याख्यानासाठी उपसरपंच किरण जगदाळे, हरिमामा जगदाळे, दिपक जगदाळे, अमोल जगदाळे, गणेश जगदाळे, रमेश बालगुडे, अमोल भोसले, दत्तात्रेय वेदपाठक, दत्ता भोसले व पत्रकार शरद भगत यांनी व्याख्यानासाठी मोठ्या प्रमाणात योगदान केले. व्याख्यान कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवनाथ जगदाळे सरांनी केले.

One Comment on “परिवर्तन व्याख्यानमालेतून गावचा विकासाचे गिरवले धडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *