सहाय्यक निबंधकांकडून सावकारांना अभय?

बारामती, 25 मेः बारामती शहरासह तालुक्यात विविध सुवर्णकारांची अनेक सोन्यांची दुकाने आहेत. या सुवर्णकार सोन्याच्या दुकानामध्ये अनेक गरजू व्यक्ती हे गरजेपोटी आपल्याकडील सोने घाण (तारण) स्वरूपात ठेवून ठराविक रक्कम उचलतात. मात्र हे सुवर्णकार व्यापारी अशा गरजू ग्राहकांकडून नियमबाह्य पद्धतीने 2 ते 5 टक्क्यांपर्यंत दरमहा व्याजदर वसूल करतात.

मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; बारामती पाण्यात बुडणार?

या सर्व प्रकाराकडे अनेकांनी लिखित स्वरुपात तक्रार देऊनही बारामती सहकार सहाय्यक निबंधक या सुवर्णकार व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई करत नाहीत. या उलट, अशा बेकायदेशीर सावकारांना अभय देतानाचे सध्याचे चित्र आहे. मात्र शहरासह तालुक्यातील बेकायदेशीर सोने विक्रेत्यांना, कंपनींना व दुकानदार यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे बारामतीमध्ये बोगस कंपन्या निर्माण होऊन सावकारीचा धंदा जोमाद सुरु असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराकडे बारामती सहाय्यक निबंधक लक्ष देणार का? असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे.

भारतीय जवान आणि हुतात्मा सन्मान सोहळा थाटात संपन्न

One Comment on “सहाय्यक निबंधकांकडून सावकारांना अभय?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *