बारामती, 12 डिसेंबरः बारामती येथील कृषि भवन येथे आज, 12 डिसेंबर 2022 रोजी पीक विमा सप्ताह उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पीक विमा सप्ताहचे औचित्य साधून भारतीय कृषि विमा कंपनी आणि कृषि विभागाच्या वतीने पीक विमा प्रचार- प्रसिद्धी रथाचा शुभारंभ बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या हस्ते करण्यात आला.
कोऱ्हाळे बुद्रुक येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटली यांचा निषेध!
या प्रसंगी कृषि अधिकारी सारिका निगडे, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि सहायक मनिषा काजळे, कोमल भानवसे, मनिषा यादव, विजया सुतार, स्वाती कोकणे, सांख्यिकी कृषि पर्यवेक्षक संतोष मोरे आदी उपस्थित होते.
पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी पीक विमा प्रचार रथाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पिक विम्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि अधिकारी बांदल यांनी दिली आहे.
बारामती शहर पोलिसांकडून चोरीच्या तब्बल 3 लाखांच्या दुचाकी जप्त
One Comment on “बारामतीत पीक विमा सप्ताह उपक्रमाचा शुभारंभ”