वर्षातील शेवटचं खंडग्रास चंद्रग्रहण आज!

मुंबई, 8 नोव्हेंबरः मागील महिन्यात 25 ऑक्टोबर 2022 रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद मिळाला. आता लगेच 14 दिवसांनंतर म्हणजे आज, 8 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा अनुभवण्यास मिळणार आहे. भारताच्या पूर्वेत्तर भागामध्ये सर्वाधिक 98 टक्के आणि 3 तास ग्रहण पहावयास मिळमार आहे. तर पश्चिम भारतातून केवळ 1 तास 15 मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळेल. हे चंद्रग्रहण या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल.

बारामतीत राष्ट्रवादीकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते. यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास तर उपच्छायेत चंद्र आल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते.

महाराष्ट्रामध्ये 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी ग्रहण दिसण्यास सुरुवात होईल. मुंबईमध्ये चंद्रोदयातच सायंकाळी 6 वाजून 01 मिनिटांनी ग्रहण सुरु होणार आहे. ते ग्रहण 7 वाजून 26 मिनिटांपर्यंत आपल्याला खंडग्रास स्थितीतील चंद्रग्रहण अनुभवण्यास मिळणार आहेत. मुंबईत फक्त 15 टक्केच चंद्रग्रहण दिसणार आहे.

बारामतीत अडीच लाखांच्या कुस्तीचा सिकंदर ठरला मानकरी

यावेळी चंद्रग्रहण सुरू असतानाच पूर्व क्षितिजावर चंद्र उगवणार आहे. या ग्रहणाला ‘ग्रस्तोदित’ चंद्रग्रहण असे म्हणतात. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य आहे. हे पूर्व आकाशात उगवताना दिसणार असल्याने हे लाल रंगाचे म्हणजेच रक्तवर्णी (रेड मून) चंद्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ते बघण्याची एक अनोखी पर्वनी आपल्याला मिळणार आहे.

अवकाशात होणारी ग्रहणे ही केवळ खगोलीय घटना आहेत. ग्रहणे केवळ ऊन सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल अंधश्रद्धा मानने चुकीचे आहे. सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी ग्रहणांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. हे ग्रहण पाहण्यासाठी कुठल्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. पूर्व दिशेला क्षितिज असेल अशा मैदानात किंवा घराच्या सुरक्षित छतावर जाऊन साध्या डोळ्यांनी, साध्या दुर्बिणीने किंवा बायनोकुलरने देखील आपण ग्रहण पाहू शकतो.

बारामतीत मायक्रोसॉफ्ट उभारणार कृषि प्रकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *