पुणे, 12 नोव्हेंबरः पुण्यासह पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर आणि मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी सात फेऱ्या राबविण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील काही विद्यार्थ्यांना अद्यापही अकरावीला प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील तब्बल 300 गुर्हाळ घरे बंद!
अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्याने अकरावीला प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी 12 ते 19 नोव्हेंबर 2022 दरम्यान शेवटची प्रवेश फेरी राबवली जाणार आहे.
कृषि उन्नती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सदर माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. अकरावीचे पहिले सत्र समाप्त होऊन दुसरे सत्र सुरू झाले आहे. मात्र अद्याप प्रवेश न मिळालेले विद्यार्थी क्षेत्रीय कार्यालये, शिक्षण संचालनालयात जाऊन प्रवेशाची विनंती करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश विलंबाची कारणे तपासल्यावर अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळणे, अन्य ठिकाणचे प्रवेश रद्द करणे, स्थलांतर आणि अन्य वैयक्तिक कारणे असल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्यासाठी प्रवेश फेरी राबवण्याचा निर्णय प्रवेश नियंत्रण समितीने घेतल्याचे नमूद करण्यात आले. अखेरच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित असलेल्या विद्यार्थ्यांना भाग दोन पसंती देऊन सहभागी होता येईल. तसेच 12 आणि 13 नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरावा लागेल. 15 आणि 16 नोव्हेंबरला दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली जाईल. 17 आणि 18 नोव्हेंबरला उपसंचालक स्तरावरून ॲलॉटमेंट दिली जाईल. ॲलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल. 19 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल. नवीन विद्यार्थी नोंदणी 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.