लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे ‘या’ तारखेला मिळणार!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता

मुंबई, 03 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज (दि.03) ही माहिती दिली आहे. यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू होईल. यासाठी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण झाली असून 7 मार्चपर्यंत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये निधी जमा केला जाईल.”

https://x.com/iAditiTatkare/status/1896507673279177187?t=zzWwRJW055kYGOHy2p5PvQ&s=19

आदिती तटकरे यांची माहिती

दरम्यान, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. मात्र, फेब्रुवारी महिना संपूनही लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे महिलांमध्ये सध्या याबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्याचा लाभ 7 मार्च रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आतापर्यंत इतका लाभ मिळाला

महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत जुलै ते जानेवारी या कालावधीत महिला लाभार्थींना सात हप्त्यांमध्ये एकूण 10,500 रुपये मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *