बारामती, 20 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 चे मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकींचा आज, 20 डिसेंबर 2022 रोजी निकाल जाहीर झाला आहे. बारामती तहसिल कार्यालयाकडून नुकताच कुरणेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर केला आहे.
मुरुम ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
कुरणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि 7 सदस्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यात सरपंच पदासाठी सर्वसाधारण स्त्री मधून आशा किसन काळभोर या विजयी झाल्या असून त्यांना 696 मते मिळाली आहे.
तर अनुसूचित जाती स्त्री प्रभाग क्र. 1 मधून सुवर्णा सुकुमार जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांना 320 मते पडली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग क्र. 1 मधून संगिता अनिल मोहिते या विजयी झाल्या आहेत. त्यांना 315 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 1 मधून अनिता नितीन शेंडगे या विजयी झाल्या असून त्यांना 358 मते मिळाली आहेत.
लोणीभापकर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 2 मधून सुवर्णा प्रकाश काळभोर या विजयी झाल्या आहेत. त्यांना 203 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 2 मधून दत्तात्रय यशवंत काळभोर हे विजयी झाले असून त्यांना 184 मते मिळाली आहेत.
सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 3 मधून दिपाली संदिप घोरपडे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 255 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 3 मधून संभाजी बाबुराव जाधव हे विजयी झाले असून त्यांना 232 मते मिळाली आहेत.
One Comment on “कुरणेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!”