कोलकाता, 5 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावले. त्यामुळे विराटने आता सचिन तेंडुलकरच्या 49 शतकाची बरोबरी केली आहे. तर या विश्वचषकातील विराट कोहलीचे हे दुसरे शतक आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1721145916084879539?s=19
एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका
तत्पूर्वी या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात वेगवान झाली. यावेळी विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची वेगवान भागीदारी केली. डावातील 6 व्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा रबाडाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहित शर्माने 24 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. त्यानंतर शुभमन गिल ही 24 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. त्यावेळी श्रेयस अय्यर 87 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. श्रेयसने त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर आलेला केएल राहुल (8) लवकर बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 22 धावा केल्या. त्याने त्याच्या छोट्या खेळीत 5 चौकार मारले. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीने शानदार फलंदाजी करीत भारताला 50 षटकांत 326 धावांपर्यंत पोहचवले. यावेळी विराट कोहली 121 चेंडूत 101 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर रवींद्र जडेजा 15 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. आफ्रिकेतर्फे दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे वय लहान- केसरकर
या सामन्यात विराट कोहलीने आपले 49 वे शतक पूर्ण केले. विराटने 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. याबाबतीत त्याने आता क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने वनडेमध्ये 452 डावात 49 शतके झळकावली होती. तर विराटने ही कामगिरी केवळ 277 डावात केली आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्याने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळे विराटच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला आहे.
2 Comments on “कोहलीची सचिनच्या विक्रमाची बरोबरी; 49वे शतक पूर्ण!”