बार्शी, 28 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने स्वतःच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि त्याने आपल्या 5 वर्षाच्या मुलाचा देखील जीव घेतला. त्यानंतर या शिक्षकाने स्वतः आत्महत्या केली, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अतुल मुंढे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर त्याच्या पत्नीचे नाव तृप्ती आणि मुलाचे नाव ओम असे आहे.
कैद्यांच्या तात्काळ सुटकेसाठी सुप्रीम कोर्टाने पोर्टल सुरू केले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी या तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून सध्या ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले जात आहेत. या घटनेचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. दरम्यान, सर्व काही सुरळीत सुरू असताना अतुल मुंढे यांनी एवढे मोठे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आता या घटनेचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
दरम्यान, अतुल मुंढे आणि त्यांची पत्नी तृप्ती हे दोघेही शिक्षक आहेत. तसेच दोघांना 5 वर्षांचा मुलगा आहे. अतुल मुंढे यांनी त्यांच्या पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या चेहऱ्यावर उशी दाबून त्याचा खून केला. या घटनेनंतर अतुल यांनी गळफास लावून घेत स्वतः आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जरांगे पाटील यांचे विधान
3 Comments on “पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःचे जीवन संपवले; शिक्षकाचे टोकाचे पाऊल”