बारामती, 17 सप्टेंबरः बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीच्या पोलीस निरीक्षक प्रभारी वृत्तपत्रासाठी एक माहितीपत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये दोन मुली घरातून पळून गेल्या व स्वारगेट येथे त्या आढळून आल्या. नंतर दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी त्या सुखरूप असून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे प्रसिद्ध पत्रिकेमध्ये म्हटले आहे. सदरच्या दोन्ही मुली अल्पवयीन असून त्या सुखरूप असल्याचे प्रसिद्ध पत्रिका म्हटले आहे. सदर दोन्ही मुलींच्या जबाबावरून एक आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. आरोपीला अटक केली असेल, तर कुठल्या कायद्यानुसार व कलमानुसार त्याला अटक केली आहे? या प्रसिद्ध पत्रकानुसार स्पष्ट होत नाही.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्हीपैकी एक अल्पवयीन मुलीचे वैद्यकीय तपासणी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दुसऱ्या मुलीचे वैद्यकीय तपासणी झाली नसल्याचे म्हटले जात आहे. शक्यता पडताळून पाहण्यासाठी गेले असता, वैद्यकीय अधिकारी या वर बोलायला तयार नाही. तर पोलिसाच्या म्हणण्यानुसार एका आरोपीस अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये तीन आरोपीचे वैद्यकीय चाचणी केल्याचे समजते.
सदरच्या पीडित मुली जर पुण्याच्या स्वारगेट परिसरात सापडल्या असतील तर हा गुन्हा पुण्यात परिसरात घडलाय की बारामती ग्रामीण हद्दीत घडलाय? हे सांगण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे येत नाही. या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक मुलगी अनुसूचित जाती-जमातीची असल्यास ॲट्रॉसिटी दाखल झाली आहे का? याबाबत पोलीस सूत्रांकडून काहीही सांगितले जात नाही. हा सामूहिक अत्याचाराचा बलात्काराचा प्रकार आहे की नाही? याबद्दल ही कोणी काही बोलण्यास तयार नाही. तर या दोन मुलींचे हरविल्यासंबंधीची तक्रार निकाली काढली आहे का? याबद्दल पोलीस यंत्रणा चकार शब्द काढायला तयार नाही. या गुन्ह्यांमध्ये नेमकी किती आरोपी निष्पन्न झाले? याबद्दल गोपनीयता पाळली जात आहे. कलम 376 (ड), ॲट्रॉसिटी, सामूहिक बलात्कार असे गंभीर गुन्हे बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडत असताना याबद्दल महिला अत्याचाराविरोधात रोज माध्यमांसमोर बोलणाऱ्या खासदार याबद्दल मौण का बागळले आहे? ‘लाडकी बहिण, महिला सशक्तीकरण, महिलांच्या सुरक्षेची हामी’ अशी वल्गना करणारे आमदार मूग गिळून का गप्प बसले आहेत?
अनुसूचित जाती जमातीच्या ढाण्या वाघांनी शेपूट खाली घातली आहे का? ‘विकसित बारामती, सुरक्षित बारामती’ असे घोषणा देणारी रणरागिणी, बारामती गोडवे गाणारी महिला आयोगाच्या अध्यक्षा झोपून गेल्या आहेत का? गणपतीच्या आरतीमध्ये गुंग झालेले शरयू फाउंडेशनच्या सर्वेसर्वा या सामूहिक बलात्काराच्या अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारावर पवार कुटुंबीय शांत का आहेत? महिलांच्या चळवळी चालवणाऱ्यांच्या बारामतीत गेल्या दिवसात दोन बलात्काराची प्रकरणे, सामूहिक बलात्काराची प्रकरणे होत असतील व यावर कोणी सामाजिक, राजकीय व्यक्ती प्रक्रिया देत नसतील तर बारामती तालुका हा मुडद्यांचा प्रदेश झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे संवेदनशील प्रकरण महिला व बाल अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वैद्यकीय विभाग व पोलीस विभाग एवढा उदासीन का? बारामती तालुक्यातील महिला चळवळीतील, सामाजिक चळवळीतील, राजकीय चळवळीतील नेते, कार्यकर्ते या नाजूक विषयाबद्दल एवढे उदासीन का? येथील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया, समाज माध्यमात यांचे शब्द बधिर का झाले आहेत? यांच्या तोंडून शब्द बाहेर का पडत नाहीत? यांच्या लेखणीतून अन्यायविरोध चिड का निर्माण होत नाही? पोलीस कर्मचारी खाजगीमध्ये सांगतात की, सामूहिक बलात्काराचा गुन्हा पुण्यात मांजरी या ठिकाणी घडला आहे. याचा तपास बारामती ग्रामीण पोलीस का करत आहे? सदर अल्पवयीन मुलगी अनुसूचित जाती जमातीची असेल, गुन्हा ॲट्रॉसिटीचा दाखल झाला असेल तर या गुन्ह्याचा तपास कुठल्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला? तसेच प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा आजपर्यंत का झाला नाही? सदरच्या मुली या जर अल्पवयीन आहेत तर त्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी कोणाची आहे? अशी कोणती ताकद आहे, जी हे प्रकरण दाबण्यासाठी एवढ्या ताकतीने प्रयत्न करत आहे? की ज्या विरोधात बारामतीतील पत्रकार तोंड उघडायला तयार नाहीत? बारामती सामाजिक, राजकीय कार्यकर्ते मूग गिळून गप्प का आहेत? अशा ताकदीच्या विरोधात आम्ही ‘भारतीय नायक’च्या माध्यमातून जाहीर निषेध करतो.
बारामती तालुक्यातील अनुसूचित जाती- जमातीतील महिलांवर अत्याचार होत असतील, सर्वसाधारण महिलांवर अत्याचार होत असतील तर ‘भारतीय नायक’ आपल्या लेखणीचे शस्त्र करून अशा अन्यायाला वाचा फोडणारच! ही गुमका कोणी उठवली, बारामती तालुका बदनाम होईल, या दोन्ही बलात्काराच्या घटना खोट्या आहेत म्हणून?