बारामती, 27 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील सुपे येथील राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी तन्मय चांदगुडे यांने बारामती तालुकास्तरीय ग्रीको रोमन (कुस्ती ) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच तन्मयची जिल्हा स्तरावरही निवड झाली आहे.
बारामतीच्या भाजप कार्यालयात संविधान दिन साजरा
राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडूखैरेवाडीच्या मुख्याध्यापिका मनिषा खैरे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली संस्थेचे शारीरिक शिक्षणाचे शिक्षक राहुल यादव सर, वैभव जराड सर, खैरे सर, सुमित जगदाळे सर यांनी तन्मय याला मार्गदर्शन केले.
बारामती नगरपरिषदेच्या धोरणाविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार!
राजे प्रतिष्ठान स्कुल खंडूखैरेवाडीतील विद्यालयातील सर्व शिक्षिकांनी तन्मयचे अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलिप खैरे यांनी तन्मय चांदगुडे याला पुणे जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असून विद्यालयातील सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे.
2 Comments on “खंडूखैरेवाडीतील विद्यार्थ्याची कुस्ती स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम”