खडकवासला, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक धरणांतून आता पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये तसेच त्यांनी याबाबत स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

https://x.com/pmccarepune/status/1827209863614648408?s=19

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत आहे. अशा परिस्थितीत आज (दि.24) सकाळी 11 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2 हजार 140 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याची माहिती पुणे मुठा कालवे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता अधिकाऱ्यांनी दिली आहे.

https://x.com/Info_Pune/status/1827223376273748346?s=19

वीर धरणातून पाण्याचा विसर्ग

सोबतच शनिवारी (दि.24) सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदी पात्रात 33 हजार 759 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच वरसगाव धरणातून शनिवारी (दि.24) सकाळी 10 वाजता 1 हजार 462 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणातून शनिवारी (दि.24) सकाळी साडेनऊ वाजता 10 हजार 031 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. तरी हा पाण्याचा विसर्ग पावसाची परिस्थिती आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा यांच्या अंदाजानुसार कमी जास्त प्रमाणात करण्यात येईल. त्यामुळे नदीकडच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

https://x.com/Info_Pune/status/1827206157850604021?s=19

https://x.com/Info_Pune/status/1827206082105663902?s=19

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणात शनिवारी (दि.24) सकाळी 8 वाजता 78.88 टक्के इतका पाणीसाठा जमा होता. त्याचवेळी पानशेत धरण 97.50 टक्के, वरसगाव धरण 98.88 टक्के, तर शनिवारी सकाळी 7.45 वाजता टेमघर धरण 100 टक्के भरले होते. तसेच वीर धरण देखील आज 100 टक्के भरले आहे आणि उजनी धरण देखील 100 टक्के भरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *