बारामती, 30 जुलैः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुढाळे येथे नुकतीच भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका यांची मासिक बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिव पदी काशिनाथ पिंगळे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला उपस्थित भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदासाठी काशिनाथ पिंगळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. काशिनाथ पिंगळे हे अनेक वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून या पुर्वी भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सचिव पदी निवड झाल्यानंतर काशिनाथ पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व पत्रकारांनी नवनिर्वाचित पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे, जिल्हा उपाध्यक्ष तैनुर शेख, पुरंदर तालुकाध्यक्ष गोरख मेमाणे, बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे, बारामती तालुका उपाध्यक्ष शंतनू साळवे, बारामती तालुका सचिव सुशिलकुमार अडागळे, संघटक महमद शेख, सोमनाथ लोणकर, अविनाश बनसोडे, शरद भगत आदी पत्रकार उपस्थित होते.
One Comment on “भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची निवड”