बारामती, 13 जूनः कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बारामतीला लवकरच भेट देणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी होणार आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर आगीचा तांडव; 4 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)
दरम्यान, कर्नाटकमधील बंगळुरू येथील सिद्धरामय्या यांच्या निवास स्थानाला बारामतीचे अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे शिष्ठमंडळाने नुकतीच भेट दिली. या भेटीत शिष्ठमंडळाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना येत्या 26 जून 2023 रोजी (सोमवार) बारामतीला अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तांने येण्याचे निमंत्रण दिले आहे.
शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता?
सदर निमंत्रण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्विकारले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास देवकाते यांनी दिली आहे.
One Comment on “कर्नाटकचे मुख्यमंत्री येणार बारामतीत…”