बारामती, 13 नोव्हेंबरः ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी संधी मिळणेकरीता आंतर तालुका क्रिकेट सामन्यांचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. सदर सामन्यांचे आयोजन पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या वतीने 31 ऑक्टोबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील 10 नामवंत संघ सहभागी झाले होते.
बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा प्रथम सामना बारामतीच्याच डी.जे.क्रिकेट अॅकॅडमी बरोबर डिझायर स्पोर्टस कोर्पोरेशन लोणी काळभोर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये डी.जे. क्रिकेट अॅकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरीता आमंत्रित केले. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुष्यंत इंगुले व इंद्रजित साळवे यांची 138 धावांची सलामी दिली. त्यामध्ये अनुक्रमे दुष्यंत इंगुले 85 धावा व इंद्रजित साळवे 53 धावा केल्या. त्यानंतर सुरज जाधव 21 धावा, वसिम शेख 19 धावा केल्या. या फलंदाजीच्या जोरावर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने 184 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला.
सदर धावांचा पाठलाग करताना सुरज वाघमारे (4-22-2), वसिम शेख (3-17-1), मोहित जाधव (3-35-1) यांच्या गोलंदाजीसमोर डी.जे. क्रिकेट अॅकॅडमीचा संघ 151 धावांमध्ये गारद करून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमधील साखळी सामन्यातील पहिल्या मॅचमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने विजयी सलामी करून सुरूवात केली. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा फलंदाज दुष्यंत इंगुले यास सामनावीराचा बहुमान देण्यात आला.
त्यानंतर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा दुसरा सामना इंदापूर येथील एस.जे.क्रिकेट अॅकॅडमी बरोबर लिजंड स्पोर्टस अॅकॅडमी मुंढवा, हडपसर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये एस.जे. क्रिकेट अॅकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरीता आमंत्रित केले. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना अनुक्रमे दुष्यंत इंगुले 45 चेंडूमध्ये 61 धावा, सुरज जाधव 20 चेंडूमध्ये 42 धावा, हर्षवर्धन ठाकूर 7 चेंडूमध्ये 17 धावांच्या जोरावर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने 19 षटकांमध्ये 184 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना एस.जे. अॅकॅडमीचा संघ वसीम शेख (4-11-2), सुरज जाधव (4-10-3), मोहित जाधव (4-7-2), जोशुवा जाधव (1-4-2) यांच्या गोलंदाजीसमोर एस.जे. क्रिकेट अॅकॅडमीचा संघ 74 धावांमध्ये गारद करून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमधील साखळी सामन्यातील दुसऱ्या मॅचमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने विजय मिळविला. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऑलराउंडर सुरज जाधव यास सामनावीराचा बहुमान मिळाला.
बारामतीत सरकारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा तिसरा सामना उरळी कांचन येथील वॉरिअर्स क्रिकेट अॅकॅडमी बरोबर डिझायर्स स्पोर्टस् कॉर्पोरेशन, लोणी काळभोर, ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व समोरील संघाला फलंदाजी करण्याकरीता आमंत्रित केले. त्यामध्ये गोलंदाजी करताना मोहित जाधव (4-19-3) व सुरज जाधव (4-16-4) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वॉरिअर्स क्रिकेट अॅकॅडमी संघ 20 षटकांमध्ये 108 धावा करून तंबूत परविण्यात यश आले. प्रतिउत्तरास सदर धावांचा पाठलाग करताना कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने एका विकेटच्या मोबदल्यामध्ये इंद्रजित साळवे 20 चेंडूमध्ये 38 धावा व दुष्यंत इंगुले 40 चेंडूमध्ये 61 धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर एकहाती विजय मिळवित दिमाखदार पद्धतीने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऑलराउंडर सुरज जाधव यास सामनावीराचा बहुमान मिळाला.
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीचा सामना उरळी कांचन येथील वैभव क्रिकेट अॅकॅडमी बरोबर लिजंड स्पोर्टस अॅकॅडमी मुंढवा, हडपसर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व समोरील संघाला क्षेत्ररक्षणाकरीता आमंत्रित केले. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुष्यंत इंगुले 25 चेंडूमध्ये 30 धावा, सुजित उबाळे 10 चेंडूमध्ये 19 धावा, सुरज जाधव 10 चेंडूमध्ये 20 धावा, सुरज वाघमारे 8 चेंडूमध्ये 17 धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 130 धावा उभारल्या. सदर धावांचा पाठलाग करताना मोहित जाधव (4-11-0) व वसिम शेख (4-7-0), सुरज वाघमारे (4-23-2) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वैभव क्रिकेट अॅकॅडमी संघ 20 षटकांमध्ये 124 धावा करून पराभूत झाला सदरचा सामना जिंकून कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने मोठ्या दिमाखात अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऑलराउंडर सुरज वाघमारे यास सामनावीराचा बहुमान मिळाला.
मुंबई-पुणे मार्गावर भीषण अपघात; महिला ठार
कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा अंतिम सामना दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी डी.जे.क्रिकेट अॅकॅडमी बरोबर लिजंड स्पोर्टस अॅकॅडमी मुंढवा, हडपसर ता. हवेली याठिकाणी खेळला गेला. या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत रोमहर्षक व अती-तटीच्या या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुष्यंत इंगुले 19 चेंडूमध्ये 19 धावा, वैभव कांबळे 20 चेंडूमध्ये 29 धावा, हर्षवर्धन ठाकूर 6 चेंडूमध्ये 16 धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 106 धावाच करता आल्या मात्र, त्यानंतर गोलंदाजी करताना चेतन शेंडे (4-9-2), वसिम शेख (4-17-2), सुरज वाघमारे (4-17-2) यांच्या गोलंदाजीसमोर डी.जे. क्रिकेट अॅकॅडमीचा संघ फक्त 93 धावांमध्ये गारद करून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकाविण्यात बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला यश आले. सदर सामन्यात कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा गोलंदाज चेतन शेंडे यास सामनावीराचा बहुमान देण्यात आला.
या वर्षामध्ये संपुर्ण जिल्ह्यात विविध वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने सलग 5 वेळा प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्यामध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून कारभारी जिमखाना क्रिकेट संघावर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बक्षिस वितरण सोहळ्यावेळी पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी विवेक डफळ, सुशिल शेवाळे, डफेदार सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होते. कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा दुष्यंत इंगुले या खेळाडूने 6 सामन्यांमध्ये 295 धावा फटकाविल्यामुळे त्यास ‘उत्कृष्ट फलंदाज’ म्हणुन ट्रॉफी देवून गौरविले. कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला नितीन सामल, विनोद यादव, संजय हाडके, सचिन माने यांचे मार्गदर्शन व प्रशांत (नाना) सातव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
One Comment on “कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने जिंकली आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा!”