बारामती, 1 सप्टेंबरः कोरोना काळच्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘गणपती बप्पा मोरया’ च्या गजरात बारामती शहरात गणपती मोठ्या हर्षोल्हासात आणि पारंपरिक पद्धतीने 31 ऑगस्ट रोजी स्वागत करण्यात आले. बारामतीसह परिसरात घरोघरी गणपती मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात सुरुवात झाली. यामुळे शहरातील भिगवण रोड शेजारी मएसो हायस्कूल, पीएनजी चौक, सुर्यनगरी चौक, संदीपा कॉर्नर, आणि एमआयडीसी चौकात जवळ उभारलेल्या गणपती स्टॉलवर सकाळी 6 वाजले पासून लाडक्या गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.
जिल्हाधिकारी देशमुख यांचे नागरिकांना आवाहन
दुपारी 2 पर्यंत घरोघरी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी नागरिकांनी तर मध्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मंगल मुर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत बारामतीत गणपतीचे आगमन करण्यात आले. यावेळी शहरातील चौका- चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.