पुणे, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) जितेंद्र डुडी यांनी गुरूवारी (दि. 02) पुणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार सोपवला. जितेंद्र डुडी आता पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. नवीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा नवी दिशा घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जितेंद्र डुडी यांच्या नियुक्तीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची आता सातारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1874822386362855617?t=iuh9gI9Bcuzvf3b7KwzYGA&s=19
https://x.com/Info_Pune/status/1755479055275626793
डॉ. सुहास दिवसे यांचा कार्यकाळ:
सुहास दिवसे यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रथम कृषी आयुक्तपद भूषवले. त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. सुहास दिवसे यांनी 8 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात पुण्यातील प्रशासनात अनेक सुधारणा करण्यात आल्या. मात्र, सुहास दिवसे यांची 11 महिन्यांतच बदली होऊन त्यांची नियुक्ती पुणे भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1814186346019254774?t=IzFTbeFZ8m1zEOgaFJL5uw&s=19
पुजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत
दरम्यान सुहास दिवसे यांचा पुण्यातील कार्यकाळ माजी आयएएस अधिकारी पुजा खेडकर या वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत राहिला. सुहास दिवसे यांनी पुजा खेडकर यांच्याविरोधात पदाचा गैरवापर केल्याची तक्रार केली होती. चौकशीत पुजा खेडकर यांनी ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड रद्द केली होती. त्यानंतर पुजाने सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सुहास दिवसे यांनी तिचे हे आरोप फेटाळून लावले होते. अशा आरोपांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.