बारामती, 13 नोव्हेंबरः बारामती शहरातील जिजाऊ भवन येथे मराठा समाज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, कमकुवत व भूमिहीन शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जिजाऊ शिष्यवृत्तीचे शनिवारी, 12 नोव्हेंबर 2022 रोजी वाटप करण्यात आले. हे वाटप बारामती तालुका मराठा सेवा संघ व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई यांच्या सयुंक्त विद्यमानाने करण्यात आले.
यावेळी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव तुपे, विश्वस्त देवेंद्र शिर्के, दीपक बागल, अॅड. विजय तावरे, मनोज पोतेकर व छाया कदम, जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे, संगिता शिरोळे यासह व्यवस्थापक अमोल चांदगुडे, पालक, विद्यार्थी उपस्तित होते.
कृषि उन्नती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बारामती तालुक्यातील 32 विद्यार्थ्यांना 12 वी नंतर विविध शैक्षणिक शाखांमधील शिक्षण घेण्यासाठी 4 लाख रुपयांची जिजाऊ शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याचे अध्यक्ष नामदेव तुपे यांनी सांगितले.
जिजाऊ शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करून तालुक्यातील बजरंगवाडीच्या शेतकऱ्याची मुलगी ऋतुजा साबळे हिची केंद्रीय अन्वेषण विभागमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
तालुक्यातील तब्बल 300 गुर्हाळ घरे बंद!
शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणाला मदत होते, याची जाणीव कायमस्वरूपी राहील व शिक्षण पूर्ण झाल्यावर नौकरी, व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना मदत करण्यासाठी स्फूर्ती मिळत असल्याचे शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थिनी सिमरन वाघ यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिल सावळे यांनी केले, तर आभार देवेंद्र शिर्के यांनी मानले.
2 Comments on “बारामतीत मराठा विद्यार्थ्यांना जिजाऊ शिष्यवृत्ती वाटप”