बारामतीच्या अंजनगावातील एका शाळेत अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावून जयंती साजरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर तेथील शिक्षकांसह शाळा प्रशासनावरही सर्व स्तरातून टिका होत आहे.
सदर प्रकार हा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सोमेश्वर विद्यालयात घडला आहे. या प्रकाराचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सदर चूक ध्यानात येताच शाळेचे मुख्याध्यापक एम.डी. बाबर यांनी यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.