पवारांवरील आरोपांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर; नितेश राणेंचा तो फोटो शेयर

मुंबई, 27 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी काल या दगडफेकीतील आरोपी हृषिकेश बेद्रे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोबत असलेला एक फोटो ट्विट केला होता. यावेळी अंतरवली सराटी गावात झालेल्या दगडफेकीमागे नेमका कुणाचा हात आहे? असा सवाल त्यांनी शरद पवारांना केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी या दगडफेकीतील आरोपी हृषिकेश बेद्रे याचे नितेश राणे आणि अजित पवार यांच्यासोबतचे काही फोटो शेयर केले आहे. तसेच जयंत पाटील यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, “आदरणीय पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे. सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय

दरम्यान, नितेश राणे यांनी काल हृषिकेश बेद्रे आणि शरद पवार यांचा सोबत असलेला फोटो शेयर केला होता. या फोटोत राजेश टोपे देखील दिसत होते. हा फोटो शेयर करीत नितेश राणेंनी म्हटले होते की, “दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर, 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?” असा सवाल त्यांनी थेट शरद पवारांना विचारला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत या फोटोंवरून हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

One Comment on “पवारांवरील आरोपांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर; नितेश राणेंचा तो फोटो शेयर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *