जालना, 23 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 ऑक्टोंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे सरकारने येत्या 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा 25 ऑक्टोंबरपासून मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दमदार विजय
“सरकारने मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्याकडे 30 दिवसांचा कालावधी मागितला, आम्ही त्यांना 40 दिवस दिले. आता सरकारने 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करण्यात येईल आणि हे आंदोलन राज्य सरकारला झेपणार नाही. या उपोषणादरम्यान मी पाणी पिणार नाही. तसेच कोणतेही उपचार अथवा वैद्यकीय सेवा घेणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी अत्यंत कठोर आमरण उपोषण करणार आहे.
फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे – सुप्रिया सुळे
याशिवाय 25 तारखेपासून प्रत्येक गावात आणि तालुक्यात मराठा समाजाने एकत्र येऊन या सरकारला जागे करण्यासाठी कॅन्डल मार्च काढावा. त्याचवेळी सरकारने एक गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, अन्यथा गावात प्रवेश देणार नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच येत्या 25 तारखेपासून मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल आणि याची माहिती त्यावेळी देण्यात येणार असल्याचे ही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
One Comment on “जरांगे पाटलांचा सरकारला इशारा”