इंदापूर, 14 ऑक्टोबरः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून उजनी धरणाच्या रसायनयुक्त दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. इंदापूर दौऱ्यात त्यांनी शहा गावच्या परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात होडीने फेरफटका मारुन पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक मच्छिमारांशी देखील संवाद साधला.
माळेगावात अवैध धंद्यांवर धडक कारवाई
यांनतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी पाण्यात मध्यभागी गेलो. तेथील पाणी हातात देखील घ्यावेसे वाटले नाही. हे पाणी शेती योग्य नाही. त्यामुळे माणसाच्या जीविताला या पाण्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
आपल्या माहितीप्रमाणे सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाने दिलेल्या पाणी अहवालात हे पाणी शेती योग्य तर नाहीच शिवाय जनावरांसाठी पिण्यायोग्य नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचे महादेव जानकरांनी सांगितले.
One Comment on “उजनी प्रदूषणमुक्त करण्याची जानकरांची मागणी”