जनहित प्रतिष्ठानचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सुयश

बारामती, 21 नोव्हेंबरः बारामती शहरातील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बारामती येथील तालुका स्तरीय झालेल्या कबड्डी स्पर्धेत या वर्षी 14 वर्षाखालील मुली आणि 17 वर्षाखालील मुलींच्या दोन्ही संघांनी प्रभावशाली कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. या दोन्ही संघाची निवड खेड या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक नाळे सर, शिक्षक अजिंक्य साळी, शिक्षिका वृषाली खारतोडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर, उपाध्यक्ष सतीश गायकवाड, खजिनदार सतिश धोकटे, सहसचिव घारे, गुरूकुलचे आचार्य हनुमंत दुधाळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल काटे आदींनी अभिनंदन केले.

One Comment on “जनहित प्रतिष्ठानचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सुयश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *