बारामती, 22 फेब्रुवारीः बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित बारामती प्रीमियर लीग या टेनिस बॉल वरील क्रिकेट स्पर्धेस आज, गुरुवारी (दि. 22) जय (दादा) पवार यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांकडून स्पर्धेविषयी माहिती घेतली.
आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! चेन्नई विरुद्ध बंगलोर यांच्यात पहिला सामना
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील, नगरसेवक सचिन सातव, राष्ट्रवादीचे बारामती शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल तसेच बारामती प्रीमियर लीग स्पर्धेचे मुख्य आयोजक रविंद्र (पप्पू)सोनवणे-(पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष आरपीआय आठवले) अभिजीत कांबळे-(बारामती शहर अध्यक्ष आरपीआय आठवले) योगेश व्हटकर- (बादशाह स्पोर्ट्स) सुरज अहिवळे (सामाजिक कार्यकर्ते), पत्रकार मोईन बागवान तसेच बारामती शहर आणि तालुक्यातील युवक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेतून बाहेर! गुजरातला मोठा धक्का
या वेळी जय पवार यांनी स्पर्धेतील युवा खेळाडूंशी संपर्क साधला. काही सामन्यांचा अस्वाद घेत जय पवार यांनी युवा खेळाडूंना आणि बीपीएल च्या आयोजक आणि टिमला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.