बलात्कार घटनेच्या निषेधार्थात जय मल्हार क्रांती संघटनेचा मोर्चा

इंदापूर, 8 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे एका रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवर एका नराधामाने बळजबरी बलात्कार केला. या बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना इंदापूर तालुका च्या वतीने आज, बुधवार (8 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11 वाजता इंदापूर तहसील कार्यालयावर निषेधमोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, भांडगाव तालुका इंदापूर येथील रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेऊन बळजबरीने तोंड दाबून बलात्कार करण्यात आला. जर ही गोष्ट कोणाला सांगितली, तर तुझ्यासहीत तुझ्या घरादाराला मारून टाकीन, अशी जिव मारण्याची धमकी आरोपी सुदाम रामचंद्र तरंगे याने अल्पवयीन पीडितेला दिली.

राज्यात अवकाळी पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ही घटना जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच, या घटनेचा आवाज उठवत इंदापूर तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या शंभर ते दीडशे पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव घेऊन इंदापूर पोलीस ठाण्यात त्या पिडीत कुटुंबाला घेऊन रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर 376 कलमासह पोस्को गुन्ह्याअंतर्गत कारवाई केली आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत अंडी आणि केळी मिळणार!

आशा घटना परत महाराष्ट्र होवू नये, म्हणून या घटनेचा निषेध करण्याकरिता जय मल्हार क्रांती संघटना इंदापूर तालुका यांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती दौलत उमाजी शितोळे (संस्थापक अध्यक्ष- जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य) यांनी दिली.

2 Comments on “बलात्कार घटनेच्या निषेधार्थात जय मल्हार क्रांती संघटनेचा मोर्चा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *