दिल्ली, 27 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) एखाद्या व्यक्तीने स्वतःची खरी ओळख लपवून त्याने एखाद्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर तो आता बलात्कार मानला जाणार नाही, तर ते छळ आणि फसवणूक मानली जाणार आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात आता केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे. तसेच अशा प्रकरणात न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. याबाबत निधिविषयक संसदीय समितीने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आता संसदेत सादर होणार आहे. त्यामुळे हे विधेयक लवकरच लागू होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत मोदी जाणुनबुजून बोलले नाहीत – जरांगे पाटील
त्यानुसार, एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसे केले तर तो बलात्कार मानला जाणार नाही, तर तो फसवणूक मानला जाईल. अशा व्यक्तींना 10 वर्षांपर्यंत शिक्षा होणार आहे. असे या अहवालात म्हटले आहे. तसेच नोकरी, बढती किंवा लग्नाचे आश्वासन देताना ओळख लपवून कोणाशी लग्न करणे ही छळ आणि फसवणूक समजली जाईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
दरम्यान, गेल्या काही काळामध्ये महिलांची अशाप्रकारे फसवणूक करून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता संसदीय समिती महिलेची फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कलम 69 नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद करणार आहे. तसेच स्वतःची ओळख लपवून लग्न करणे आणि शारिरीक संबंध ठेवणे अशा प्रकरणांमध्ये आता वेगळा खटला चालवण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महिलांची फसवणूक याचबरोबर लव जिहाद सारख्या घटनांना आळा बसणार आहे.
2 Comments on “ओळख लपवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा!”