इस्रोने रचला इतिहास, गगनयानची पहिली चाचणी यशस्वी

श्रीहरीकोटा, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज (दि.21) आपल्या गगनयान या मोहिमेची यशस्वी चाचणी केली आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून सकाळी 10 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. त्यामूळे इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

कंत्राटी भरतीबाबत विरोधकांनी गैरसमज पसरवला- अजित पवार

तत्पूर्वी ही गगनयान चाचणी आज सकाळी 8 वाजताच होणार होती. मात्र खराब हवामानामुळे उड्डाणाच्या आधीच ही चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर ही चाचणी अर्धा तास पुढे ढकलण्यात आली होती. मात्र बराच वेळ ही चाचणी थांबवण्यात आल्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र अखेर ही चाचणी 10 वाजता यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी उपस्थित शास्त्रज्ञांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

वानखेडे मैदनावरील सामन्यांआधी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना

पृथ्वीच्या 400 किमी कक्षेत मानवांना अंतराळात पाठवणे आणि नंतर त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्रोचे या मोहिमेमागील उद्दिष्ट आहे. दरम्यान, अवकाशान मोहिमेतील यानात काही बिघाड झाला तर, यानाचा लगेचच स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अंतराळवीरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. आता इस्त्रोच्या गगनयान मोहिमेमुळे यानात गेलेल्या अंतराळवीरांना सुखरूपपणे जमिनीवर आणता येणार आहे. या मोहिमेची ही पहिली चाचणी आहे. आता महिन्याभरात याची दुसरी चाचणी पार पडणार आहे. यासंदर्भात इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी माहिती दिली आहे.

 

One Comment on “इस्रोने रचला इतिहास, गगनयानची पहिली चाचणी यशस्वी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *