बारामती, 22 जुलैः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच नागरीकांची सरकारी कार्यलयात होणारे हलपाटे थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी ही योजना संपुर्ण राज्यात राबविण्यात येत असते. या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ हा सर्वसामान्यांना मिळत असतो. मात्र बारामती तालुक्यातील मुर्टी गावात शासन आपल्या दारी योजना फक्त कागदावरच? असेच चित्र असल्याचे तेथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. ‘भारतीय नायक’चे प्रतिनिधी बाळासाहेब बालगुडे यांनी मुर्टी येथील ग्रामस्थांशी शासन आपल्या दारी योजनेबद्दल त्यांचे मत जाणून घेतले आहेत.
श्रेय्या काळाणे हिचा तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
बारामती तालुक्यातील मुर्टी गावात 21 जुलै 2023 रोजी शासन आपल्या दारी योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेला ग्रामस्थांमधून नाराजीचे सुर उमटलेले दिसले. तसेच शासन आपल्या दारी ही योजना फक्त कर्मचाऱ्यांनी कागदावर दाखवण्यासाठीच राबवली आहे का? या योजनेमधून सर्वसामान्यांना जो होणारा फायदा म्हणजे उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल, ईडब्ल्युएस, रेशनिंग कार्ड वाटप आदी कामेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीने होत आहेत. मात्र त्यामधील एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ही योजना संपूर्ण फेल झाली आहे.
शासन आपल्या दारी या योजनेचे उद्दिष्ट होते की, तालुक्याच्या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी शासनाने राबवलेली ही योजना आहे. ज्या गावांमध्ये शासन आपल्या दारी योजना आहे, त्या गावांमधील ग्रामस्थांना त्या त्या ठिकाणी शैक्षणिक असो किंवा सरकारी कामासाठी लागणारे दाखले हे दिले जातील. परंतु असे काही न होता, जे अधिकारी व कर्मचारी नेहमी ग्रामसेवक असो तलाठी असो कृषी अधिकारी असो हे रोजचेच अधिकारी असल्यामुळे ग्रामस्थांचे कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. त्यामुळे ही योजना संपूर्ण फेल ठरलेली आहे. शासनाने सेटअप लावून ज्या गावांमध्ये होणार आहे, त्या गावांमध्ये एक दिवस संपूर्ण हे लागणारे कागदपत्राचे वाटप केले जावे, असे मुर्टी गावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मोरगावातील शाळांना जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे झाडे वाटप
या योजनेवेळी कृषि अधिकारी प्रविण माने, गाव कामगार तलाठी प्रविण जोजारे,, ग्रामसेवक रोहिणी पवार, महापारेषण कर्मचारी वीरकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
2 Comments on “शासन आपल्या दारी योजना फक्त कागदावरच?”