मुंबई, 31 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएलच्या फ्रँचायझींनी संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन यांसारख्या प्रमुख खेळाडूंना फ्रँचायझींनी आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्याचवेळी केएल राहुल, रिषभ पंत, इशान किशन, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंना फ्रँचायझींनी आपल्या संघातून मुक्त केले आहेत. त्यामुळे हे खेळाडू यंदाच्या मेगा लिलावात दिसणार आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंह धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. या रिटेन्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला सर्वाधिक 23 कोटी रुपयांत कायम ठेवले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने विराट कोहलीला आणि लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला 21 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवले आहे.
https://x.com/IPL/status/1851969903202631727?t=xkIqGdQ9w63IK3zrktJArw&s=19
https://x.com/IPL/status/1851970334335078680?t=w_25ULIsdRFeGEVrMSnNHw&s=19
कोणत्या संघांनी कोणते खेळाडू कायम ठेवले?
1) मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा – 16.30 कोटी रुपये
जसप्रीत बुमराह – 18 कोटी रुपये
सूर्यकुमार यादव – 16.35 कोटी रुपये
हार्दिक पंड्या – 16.35 कोटी रुपये
तिलक वर्मा – 8 कोटी रुपये
2) चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाड – 18 कोटी रुपये
रवींद्र जडेजा – 18 कोटी रुपये
मथिशा पाथिराना – 13 कोटी रुपये
शिवम दुबे – 12 कोटी रुपये
महेंद्रसिंह धोनी – 4 कोटी रुपये
3) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू
विराट कोहली – 21 कोटी रुपये
रजत पाटीदार – 11 कोटी रुपये
यश दयाल – 5 कोटी रुपये
https://x.com/IPL/status/1851970093477171561?t=tSG-juKuN5erCibCRM1GQA&s=19
4) राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन – 18 कोटी रुपये
यशस्वी जैस्वाल – 18 कोटी रुपये
रियान पराग – 14 कोटी
ध्रुव जुरेल – 14 कोटी
शिमरॉन हेटमायर – 11 कोटी
संदीप शर्मा – 4 कोटी
5) कोलकाता नाईट रायडर्स
सुनील नारायण – 12 कोटी रुपये
रिंकू सिंग – 13 कोटी रुपये
आंद्रे रसेल – 12 कोटी रुपये
वरुण चक्रवर्ती – 12 कोटी रुपये
हर्षित राणा – 4 कोटी रुपये
रमणदीप सिंग – 4 कोटी रुपये
6) पंजाब किंग्स
शशांक सिंग – 5.5 कोटी रुपये
प्रभसिमरन सिंग – 4 कोटी रुपये
7) दिल्ली कॅपिटल्स
अक्षर पटेल – 16.50 कोटी रुपये
कुलदीप यादव – 13.25 कोटी रुपये
ट्रिस्टन स्टब्स – 10 कोटी रुपये
अभिषेक पोरेल – 4 कोटी रुपये
8) सनरायझर्स हैदराबाद
पॅट कमिन्स – 18 कोटी रुपये
हेनरिक क्लासेन – 23 कोटी रुपये
अभिषेक शर्मा – 14 कोटी रुपये
ट्रॅव्हिस हेड – 14 कोटी रुपये
नितीश कुमार रेड्डी – 6 कोटी रुपये
9) लखनौ सुपर जायंट्स
निकोलस पूरन – 21 कोटी रुपये
मयंक यादव – 11 कोटी रुपये
रवी बिश्नोई – 11 कोटी रुपये
आयुष बडोनी – 4 कोटी रुपये
मोहसिन खान – 4 कोटी रुपये
10) गुजरात टायटन्स
राशिद खान – 18 कोटी रुपये
शुभमन गिल – 16.5 कोटी रुपये
साई सुदर्शन – 8.5 कोटी रुपये
शाहरूख खान – 4 कोटी रुपये
राहुल तेवतिया – 4 कोटी रुपये