आयपीएल 2024 चा लिलाव होणार परदेशात!

दिल्ली, 27 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतात सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरु आहे. तर दुसरीकडे आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल 2024 साठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. हा लिलाव दुबईत होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा लिलाव देशाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय ने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

ओळख लपवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा!

याबाबतचे वृत्त क्रिकेट वेबसाइट क्रिक इन्फो ने दिले आहे. त्यानुसार या लिलाव प्रक्रियेसाठी 10 आयपीएल संघांना कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रियेतील खेळाडूंची नावे निश्चित करण्यात येतील. आयपीएलचा हा मिनी लिलाव असणार आहे. हा लिलाव एका दिवसात पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेत काही नवे भारतीय, परदेशी खेळाडू तसेच खरेदी न झालेले खेळाडू त्यांचे नाव नोंदवणार आहेत. हा मिनी लिलाव दरवर्षी होत असतो. तर आयपीएलचा मेगा लिलाव दर 4 वर्षांनी होतो.

दरम्यान, आयपीएल 2024 च्या लिलावात सर्व फ्रँचायझीसाठी प्रत्येकी 100 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 कोटी रुपयांनी वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी सर्व संघासाठी प्रत्येकी 95 कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. तत्पूर्वी, आयपीएल 2024 च्या लिलावात सध्या पंजाब किंग्सकडे सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. पंजाब किंग्जकडे 12.20 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर त्यापाठोपाठ सनरायझर्स हैदराबादकडे 6.55 कोटी, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सकडे 4.45 कोटी, लखनऊ सुपर जायंट्सकडे 3.55 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 3.35 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 1.75 कोटी, कोलकाता नाइट रायडर्सकडे 1.65 कोटी आणि सध्याचे चेन्नई सुपरजायंट्सकडे 1.65 कोटी रुपये शिल्लक आहेत.

मराठा आरक्षणाबाबत मोदी जाणुनबुजून बोलले नाहीत – जरांगे पाटील

One Comment on “आयपीएल 2024 चा लिलाव होणार परदेशात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *